VIDEO : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांची भेट घेणार - संजय राठोड - संजय राठोड घेणार मुख्यमंत्र्याची भेट
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची आम्हाला चिंता वाटत आहे. अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात असून गुन्हेगारीकडे वळत आहे. अनेक खूनाच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्याकडे घातकशस्त्रे, रिव्हॉल्वर आढळून येत आहे. त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाने सर्च मोहीम राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. तसेच अल्पवयीन मुलांमध्ये जनजागृतीबाबत उपययोजना राबविणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय राठोड यांनी दिली आहे. शिवाय शहरातील गुन्हेगारी आता ग्रामीण भागातही वाढत चालली आहे. ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील पोलिसांचा वचक संपुष्टात आला काय असाही प्रश्न निर्माण होत आहे. या सदंर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेवून त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडणार असल्याचे माजीमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी सांगितले.