आरोग्य खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी - आशिष शेलार - आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून प्रकरण संपणार नाही, ज्या आमच्या विद्यार्थ्यांची ही संधी हुकली त्यांनी केलेली मेहनत, कुटुंबाचा त्याग आणि त्यानंतर त्यांचे झालेले नुकसान याला आरोग्य खाते जबाबदार आहे. काही दलालांना आधीच प्रश्न पत्रिका कशी मिळाली, ती ठराविक लोकांपर्यंत कशी पोहचते, पोलीस यंत्रणेला याबाबत कसे काही कळत नाही, हा सत्तेचा दुरुपयोग नव्हे का, त्यामुळे माफी मागायची आणि पळ काढायचा, असे करता येणार नाही. राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आरोग्य विभागाच्या परिक्षांवर प्रतिक्रिया दिली.