चंद्रकांत पाटलांचे बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा - मंत्री अशोक चव्हाण - मराठा आरक्षण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13761272-1084-13761272-1638105556573.jpg)
नांदेड - महाविकास आघाडी सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा ( Reservation ) मुद्दा रखडून ठेवला, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना मंत्री अशोक चव्हाण ( Minister Ashok Chavan ) म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचे हे बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे जाणून घेऊन बोलावे. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.