एकजुटीचे दर्शन : लाखो दिव्यांनी उजळली अंबा नगरी - कोरोना विषाणू
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात रविवारी रात्री 9 वाजता करोडो नागरिकांनी दिवे प्रज्वलित करून एकतेचा संदेश दिला. अमरावती शहरात सुद्धा लाखो अमरावतीकरांनी दिवे, पणत्या पेटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकजुटीचे दर्शन घडवले.