भारतात फुटबॉलला प्राधान्य नसल्याची छोट्या फुटबॉलपटूची खंत - भारत फुटबॉल परिस्थिती
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8834312-116-8834312-1600335162448.jpg)
मुंबई - आपल्या क्रिकेटवेड्या देशात इतर खेळांकडे दुर्लक्ष होताना दिसते. तर फुटबॉल व इतर मातीतील खेळ रुजवण्याचे अधिकाधिक प्रयत्न सुरू असल्याचे सरकारकडून सांगितले. मात्र, केवळ एक दिवस डंका वाजवून हे साध्य होत नाही. त्यासाठी अगदी शालेय स्तरापासूनच प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी पुरेशी मैदाने हवीत, स्पर्धा हव्यात, खेळाडूंना प्रोत्साहन हवे. या गोष्टी सर्व खेळाडूंना मिळाल्या तरच जागतिक कीर्तीचे खेळाडू घडवण्याचे ‘गोल’ साध्य होईल. भारतात फुटबॉलला प्राधान्य नसल्याची खंत मुंबईतील लहानग्या खेळाडूंनी व्यक्त केली आहे.