ग्रंथालये-वाचनालये आजपासून सुरू; नियमावली न मिळाल्याने व्यवस्थापकांमध्ये संभ्रम - महाराष्ट्र वाचनालय सुरू न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्य सरकारने नियमांचे नवीन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये आजपासून राज्यातील सर्व ग्रंथालये व वाचनालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मुंबईत ग्रंथालय व्यवस्थापकांना यासंदर्भात शासनाकडून कोणत्याही सूचना न आल्याने ते संभ्रमात आहेत. तर, शासनाच्या ग्रंथालय सुरू करण्याच्या निर्णयामुळे वाचन प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबईतील दादर सार्वजनिक वाचनालयातून ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी याचा आढावा घेतला...