आगींच्या घटनांनंतर सरकारने काय खबरदारी घेतली हे जनतेला कळू द्या - प्रविण दरेकर - pravin darekar on ahmednagar hospital fire
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्य सरकारची आरोग्य व्यवस्था ही अत्यंत ढिसाळ आहे. प्रत्येक वेळेला रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर सरकार चौकशीचे आदेश देते, त्यापेक्षा सरकारने खबरदारीच्या काय उपाययोजना केल्या याची माहिती द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आयसीयू विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.