MLC Election 2021 : सतेज पाटलांनी अमल, शौमिका महाडिकांचे मानले आभार, म्हणाले विनय कोरेंचीही महत्वाचा वाटा - सतेज पाटील विजयी
🎬 Watch Now: Feature Video
प्राप्त परिस्थितीचा विचार करून भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी सामंजस्याने विधानपरिषद निवडणूक (Maharashtra MLC Election 2021 ) बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी विजयानंतर व्यक्त केली. कोल्हापूर, धुळेची निवडणूक आज बिनविरोध झाली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होत असताना विरोधी उमेदवार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही पुढाकार घेतला, त्यामुळे त्यांचेही सतेज पाटील यांनी आभार मानले.
कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक (Maharashtra MLC Election 2021 ) बिनविरोध होत असताना यामध्ये आमदार विनय कोरे यांची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आभार मानले. ते पुढे म्हणाले, 270 मतांचा आकडा आम्ही याठिकाणी पार केला होता, शिवाय राज्य पातळीवर सुद्धा सर्वांना याबाबत जाणीव होती. त्यामुळेच लढत होण्यापेक्षा सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे याबाबत दोन्ही पक्षांनी राज्य पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध केली, असेही ते म्हणाले. शिवाय यापुढे वयक्तिक पातळीवर निवडणुका होऊ नयेत अशी सर्वांची अपेक्षा असेल अशी प्रतिक्रिया सुद्धा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.