Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - Corona Bulletin
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ३९७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रासोबत केरळ, पंजाब, तमिळनाडू राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरूवात झाली असून लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिटायझेशन, योग्य शारीरिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे.