Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८७०२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अमरावती विभागातील अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. दुसरीकेड, पुण्यात शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरु आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिडायजेशन, योग्य शारीरिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे.