कोर्टात जाऊन भाजपला काही फायदा होईल असे वाटत नाही - छगन भुजबळ - second day of assembly
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : निलंबनाच्या विरोधात भाजपचे आमदार कोर्टात जात असतील तर जाऊ द्या, मात्र कोर्टात गेल्याने काही फायदा होणार नाही असे मला वाटते असे मत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कोर्टानेच सदनात होणाऱ्या बेशिस्तीवर ताशेरे ओढलेले आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन काही फायदा होणार नाही असे वाटत असल्याचे भुजबळ म्हणाले. याशिवाय कालचा प्रकार राज्यपालांसह संपूर्ण राज्याने बघितला आहे. त्यामुळे राज्यपालही यावर भाजपसाठी सकारात्मक भूमिका घेतील असे वाटत नसल्याचे भुजबळ म्हणाले.