पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ.. - palghar cyclone impact
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघरमध्येही मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली असून वीजपूरवठादेखील खंडीत झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.