मुंबईत पावसाचा कहर; भिंती पडण्याच्या विविध घटनांमध्ये अनेकांचे संसार उद्धवस्त... - MUMBAIKAR
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - तब्बल चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने मंबईचे जनजीवन तर विस्कळीत केलेच. शिवाय अनेकांचे संसारही उद्धस्त केले आहेत. मुंबईसाठी सोमवारची रात्र ही काळरात्रच ठरली. याच रात्री पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून तब्बल 19 जणांना जीव गमवावा लागला. तर कल्याणमध्ये नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.