गुरु मॉं कांचन गिरी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला - etv bharat live
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गुरु मॉं कांचन गिरी आणि सुर्याचार्य आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आहेत. भेटीपूर्वी गुरुमा आणि सूर्या चार्यजी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. राज ठाकरेंबरोबर हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भेट होत असल्याचे कांचनगिरी यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरुन टीका केली. तसेच, राज ठाकरे हे बोलतात ते करून दाखवतात असही ते म्हणाले आहेत.