आटपाडीत उत्तरेश्वर यात्रेनिमित्त भरला 'शेळ्या-मेंढ्यांचा' बाजार - uttareshwar yatra at sangli district
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भरलेल्या शेळ्या-मेंढ्या आणि बकऱ्याच्या यात्रेत विक्रमी साडेचार हजारावर आवक झाली. यात्रास्थळी रंगवलेल्या आणि सजवलेल्या मेंढ्या-बकऱ्यानी फुलला होते. तर लाखोंची उलाढाल या यात्रेत झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेळ्या-मेंढ्या आणि बकऱ्याच्या बाजारासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या स्थितीनंतर पार पडणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने बाजार समितीच्या आवारात शेळ्या-मेंढ्या आणि बकरे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गेली दीड वर्षे आनेक गावच्या यात्रा बंद असल्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिलीच भरलेल्या आटपाडीच्या यात्रेत विक्रमी साडेचार हजारावर आवक झाली आहे. हौशी शेतकऱ्यांनी जातिवंत आणि दर्जेदार मेंढ्या आणि बकऱ्यांना झुली पांघरून रंगून वाद्याच्या गजरात बाजारात आणले होते. यात्रेत सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी आले होते.