शाळा सुरु झाल्याचा आनंद, मात्र परीक्षा ऑनलाइनच घेण्यात यावे - विद्यार्थी - परीक्षा ऑनलाइनच घेण्यात यावे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - तब्बल दीड वर्षानंतर महाराष्ट्रात आता शाळा सुरु झाली आहे. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी शिक्षक व शाळेचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. गेले दोन वर्ष ऑनलाइन अभ्यासक्रम असल्यामुळे आता ऑफलाइन परीक्षा घेऊ नये, अशी मागणीसुद्धा विद्यार्थी करत आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एम एस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करतानाच आता चार महिन्यांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेणे हे आमच्यासाठी खूप कठीण असल्याचे सांगितले आहे.