काँग्रेसचे १० आमदार देखील निवडून येणार नाहीत - गिरीश महाजन - maharashtra assembly elections
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक नेता आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोर लावत आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. यामध्ये आगामी निवडणुकींबाबत त्यांचे मत विचारले असता, महाराष्ट्रातील निवडणुकीत महायुतीला अनुकुल असे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तर, काँग्रेसची परिस्थिती या निवडणुकीत अतिशय वाईट आहे. काँग्रेसचे सेनापती फक्त आपआपल्या मतदारसंघात प्रचार करत बसलेत, त्यातील कोणीही सभा घेत नाही. पृथ्वीराज चव्हाण फक्त अधून मधून टीव्हीवर मुलाखती देतांना दिसतात. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला, १० चा आकडा देखील पार करता येणार नाही. तर, युतीला 220 हुन अधिक जागा मिळतील असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
Last Updated : Oct 16, 2019, 4:23 AM IST