Video : जन आशीर्वाद यात्रा तर होणारच, शिवसेनेच्या राड्यानंतर प्रमोद जठारांची प्रतिक्रिया - भाजप
🎬 Watch Now: Feature Video
चिपळून : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खालच्या थराची टीका केली. यावरून राजकारण तापले आहे. राज्यभर तणावाचे वातावरण आहे. त्यातच भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. राणेंची रायगडमध्ये ही यात्रा आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून यात्रेत बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर जन आशीर्वाद यात्रा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जन आशीर्वाद यात्रा तर होणारच, असे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे. तर, डीवायएसपी सचिन बारी यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलण्याचे टाळले.