Ashadhi Ekadashi 2021 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी औपचारिक प्रस्थान - departure of Sant Tukaram Maharaj Palkhi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 1, 2021, 7:36 PM IST

पिंपरी-चिंचवड - जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा 336 वा पालखी सोहळा आज पार पडत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच सावट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत असून 19 जुलै रोजी एसटीने पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती देवस्थांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात आज पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास मुख्य मंदिरातून हरिनामाच्या गजरात पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घालत प्रस्थान ठेवले. त्यानंतर, पालखी मुख्य मंदिरात 19 जुलैपर्यंत विसावणार असून त्यानंतर पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.