डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही - thane breaking news
🎬 Watch Now: Feature Video

कल्याण-डोंबिवली (ठाणे) - डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ पूर्व दिशेला असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग गुरुवारी (दि. 15 जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब, तीन पाण्याचे टँकर दाखल झाले असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रिण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सुदैवाना यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे.