शेतकऱ्यांना मुर्ख बनवणारा अर्थसंकल्प; भंडाऱ्यातील शेतकरी असमाधानी
🎬 Watch Now: Feature Video
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शेतकरी आणि शेतीच्या उत्थानासाठी बऱ्याच गोष्टींच्या घोषणा केल्या असल्या तरी, या घोषणा प्रत्येक वेळेस फक्त कागदोपत्री असल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सध्या असमाधानी असल्याचे दिसत आहे. झिरो बजेट शेती असो किंवा सिंचन व्यवस्था असेल तसेच दूध उत्पादन वाढीचे लक्ष्य, मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी तरतुदी असतील या सर्व गोष्टी जर प्रत्यक्षात अमलात येत असतील तरच त्या फायद्याच्या ठरतात. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख बनविण्याचे काम असल्याचे परखड मत शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे.