कृषी कायदे रद्द झाल्याच्या घोषणेनंतर स्वाभिमानीकडून साखर वाटप करत जल्लोष
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - तीन कृषी कायदे रद्द झाल्याच्या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर येथील नामदेव पायरी जवळ वारकरी भाविकांना साखर वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकारचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आभारही मानले. केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी दाखवलेल्या चिकाटीचे हे यश आहे. याच चिकाटीच्या जोरावर केंद्र सरकारला तीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी भाग पाडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभाव घ्यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यरत असल्याचीही स्वाभिमानीचे प्रवक्ते रणजित बागल यांनी सांगितले.