First pod hotel's Review : मुंबईच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने बनवलेल्या पॉड हॉटेलचा ईटीव्ही भारतने घेतला खास आढावा - मुंबई

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 23, 2021, 8:04 AM IST

मुंबई - परराज्यातून मुंबई ( mumbai ) गाठल्यानंतर तात्पुरत्या निवासाचा यक्षप्रश्न प्रवाशांसमोर असायचा. पश्चिम रेल्वेने जपानच्या धर्तीवर प्रवाशांकरीता देशातील पहिले पॉड हॉटेल ( First pod hotel in the India ) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ( Mumbai Central Railway Station ) सुरु केले आहे. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना येथील सोयी सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे, अशी भावना प्रवाशांनी ईटीव्ही भारतकडे ( ETV Bharat ) व्यक्त केली. लांबपल्ल्याच्या गाड्यांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या कालावधीसाठी निवास करण्यास अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा रिक्षा, टॅक्सी चालकांसोबत वाद निर्माण व्हायचे. जेथे निवासस्थान असायचे, तेथे जास्त पैसे आकारले जायचे. रेल्वेने प्रवास करुन आलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने आता मुंबईत तात्पुरत्या निवासाची सोय उपलब्ध केली आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाईनचे पॉड हॉटेल बनविले असून यात प्रशस्त बाथरूमची सोय करण्यात आली आहे. जपान, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स अशा सर्व मोठ्या देशांमध्ये पॉड हॉटेल्स चालतात. पश्चिम रेल्वेने याच धर्तीवर मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये पॉड हॉटेल तयार केले आहे. खाद्यपदार्थ खाण्यास येथे मनाई आहे. तसेच चप्पल, शूज घालून येथे जाण्यास बंदी असून स्वच्छता राखण्यावर भर दिल्याचे अर्बन पॉडचे जनरल मॅनेजर अजय पंडित यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.