दोनवेळेस कोरोना झाल्यानंतरचा डॉ. संजय ओक यांचा अनुभव; पाहा विशेष मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोना संक्रमण थांबण्यासाठी राज्य कोविड टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली, ज्याचे नेतृत्व प्रख्यात डॉक्टर संजय ओक यांच्याकडे देण्यात आले आहे. डॉ. ओक हे जून महिन्यामध्ये स्वतः कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच पुन्हा त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. कोरोनाची बाधा झाल्यानंतर डॉ. ओक यांनी त्यांचा अनुभव 'ई टीव्ही भारत'ला सांगितला आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर उपचारानंतर योग्य विश्रांती न घेतल्याने त्याचे अतिशय वाईट परिणाम सहन करावे लागले असल्याचे डॉ संजय यांनी म्हटले आहे.