बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सुविधांचा अभाव? डॉक्टरांनीच केली तक्रार - मुंबई
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि आयसीयू युनिटमध्ये उपचार देणाऱ्या डॉक्टरांनीच रुग्णालयातील असुविधांविषयी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. सुविधा आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर आरोग्य समितीच्या अध्यक्ष राजूल पटेल यांनी रुग्णालयात भेट देत तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.