दिवाळी विशेष : विठ्ठल व रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास - नरक चतुर्थी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13543666-thumbnail-3x2-viththal-temple-pandharpur.jpg)
पंढरपूर - दिपावलीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक तुळशी व फुलांची मनमोहक आरास तयार करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीचे साजिरे गोजिरे रुप या आरासीने अधिकच खुलून आले आहे. तर फुलांची सजावट मनमोहक वाटत आहेत. दोन हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला. करण पिंगळे रा. बीड यांनी आरास केली आहे. नरक चतुर्थी व लक्ष्मी पूजन निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस तुळस, झेंडू, गुलछडी, ऑर्किड, कामिनी, गुलाब अश्या फुलांची रंगसंगती करत सजावट करण्यात आली आहे. पायनापल या फळाचा वापरही करण्यात आला होता.
Last Updated : Nov 4, 2021, 10:10 AM IST