दिक्षाभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब यांना मानवंदना
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - आज दीक्षाभूमी येथे 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांना आदरांजली अर्पण करून बुद्ध मूर्ती पूजन करण्यात आले. त्यानंतर दीक्षाभूमी स्तुपात भन्ते नागार्जुन सुरेश ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धवंदनेने विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. कोरोनामुळे दीक्षाभूमीवर होणारा मुख्य कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीन दिवसभर दीक्षाभूमी वर अनेक कार्यक्रम पार पडणार आहे. दीक्षाभूमी परिसरात लागणारे पुस्तकांची विक्री करायला बंदी असल्याने अनेक अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी दर्शनासाठी बंदी होती. लोकांना प्रमुख द्वारावर बाहेरून दर्शन घ्यावे लागत होते. त्यामुळे यंदा भीम अनुयायांनीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आज अनेक जिल्ह्यातून भीम अनुयायांनी दर्शन घेण्यासाठी दीक्षाभूमीकड आले आहे.