Lowest temperature in Mahabaleshwar : कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वरमध्ये गोठले दवबिंदू - Lowest temperature in Mahabaleshwar
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - पश्चिम महाराष्ट्रात थंडीच्या कडाक्यात वाढ झाली आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. पारा तब्बल ६ अंशावर आल्याने ( Dew points froze in Mahabaleshwar ) महाबळेश्वरच्या अनेक भागात दवबिंदू गोठले होते. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून महाबळेश्वरची ओळख ( Mahabaleshwar as Mini Kashmir ) आहे. गेल्या काही दिवसांत गारठ्यात वाढ ( Lowest temperature in Mahabaleshwar ) झाली होती. दवबिंदू गोठवण्यापर्यंत आज गारठा पोहोचला. महाबळेश्वर भागात पडत असलेल्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरमध्ये येत ( Tourists rush in Mahabaleshwar during Winter ) असतात. दवबिंदू गोठल्याने पर्यटकांमध्ये वाढ होईल, असा अंदाज महाबळेश्वरमधील व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.