Video : आपले सरकार येण्याची चिंता सोडून जनतेसाठी रस्त्यावर उतरा; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना संदेश
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित होते.