आशा सेविकांचे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
🎬 Watch Now: Feature Video
शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आज आशा सेविकांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कोरोनाच्या कठीण काळात आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले, कोरोनाबाधित व्यक्तींची सेवा केली. मात्र, त्याबदल्यात आम्हाला दिवसाला केवळ 30 रुपये मिळाले, हा आमच्यावर अन्याय आहे. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन, महिना 22 हजार रुपये वेतन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी जिला आरोग्य अधिकारी अविनाश आहेर यांनी आशासेविका यांच्या मागण्या जाणुन घेतल्या त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय वर आशासेविका यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.