श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाऊबीजेनिमित्ताने महिला भाविकांना अनोखी भेट
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया, असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हीच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया, असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा व शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेच्या दिवशी बहीण-भावाचे औक्षण करते. याच भाऊबीज निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने महिला भाविकांना अनोखी भेट देण्यात आली आहे. सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनाला येत असलेल्या महिला भाविकांना भाऊबीजच्या निमित्ताने 10 रुपयांची नोट भेट म्हणून दिली जात आहे. या अनोख्या भेटीमुळे महिला भाविक ही भारावून जात आहे.