राज्यात सध्या ओमीक्रोन बाधित रुग्णाची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी 8 नवे ओमीक्रोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात 3 जण इंग्लंड मधून भारतात आले होते. तर अन्य 5 जण गोव्यातील स्थानिक नागरिक आहेत. राज्यात सध्या 19 ओमीक्रॉन रुग्णसंख्या झाली आहे.पणजी - राज्यात कोविडने रौद्ररूप धारण केले आहे. बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यात कोविडचे नवीन १ हजार २ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार ७१८ झाली आहे. तर एक रुग्ण मृत्युमुखी पडला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढलाराज्यात 8 नवे ओमीक्रॉन बाधितराज्यात सध्या ओमीक्रोन बाधित रुग्णाची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी 8 नवे ओमीक्रोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात 3 जण इंग्लंड मधून भारतात आले होते. तर अन्य 5 जण गोव्यातील स्थानिक नागरिक आहेत. राज्यात सध्या 19 ओमीक्रॉन रुग्णसंख्या झाली आहे.राज्यात लवकरच जीनोम सिक्वेन्सिंग मशीन मशीन बसविणार - आरोग्यमंत्रीएक्स्पर्ट कमिटी सरकारला कोविड नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. मात्र लोकांनीही कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगत राज्यात लवकरच जीनोम सिक्वेन्सिंग मशीन बसविणार असल्याचे राणे यांनी सांगितले.