मिशन धारावी : कोरोना योद्ध्यांना मशिदींचा 'असाही' झाला उपयोग - धारावी कोरोना अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाचा धारावीमध्ये शिरकाव झाल्यानंतर लोकांना घराबाहेर पडू न देणे, हे खूप मोठे आव्हान होते. तसेच धारावी ही दाटीवाटीची वस्ती असल्याने जनजागृती करणे देखील कठीण होते. मात्र, पोलिसांनी धारावीमध्ये असलेल्या जवळपास २५ ते ३० मिशिदींमधून ऑडिओ क्लिपद्वारे जनजागृती केली. लोकांना बाहेर न पडण्याचे, स्वच्छता बाळगण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आल्याचे धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...
Last Updated : Jun 26, 2020, 7:43 PM IST