राजकीय पदाचा गर्व नसलेला आमचा महाविद्यालयीन मित्र गेला... - काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे निधन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील मित्र परिवारांना दु:ख अनावर झाले आहे. सातव यांच्या निधनाचे वृत्त समजाताच त्यांच्या मित्रांनी जहांगीर रुग्णालय परिसरात गर्दी केली. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयात सातव यांच्यासोबत शिक्षण घेतलेल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजकीय पार्श्वभूमी असूनही सर्वसामान्य जीवन जगणारा मित्र हिरावला असल्याची भावना यावेळी मित्रपरिवारांनी व्यक्त केली...