'पक्षभेद विसरुन जनतेची सेवा करण्यास सरकार कटिबद्ध' - cm uddhav thackeray mira bhayandar speech
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9479157-thumbnail-3x2-k.jpg)
मीरा भाईंदर/मुंबई - पक्षभेद विसरुन जनतेची सेवा करण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कोरोनाचे संकट पाहता मास्क, सॅनिटायझर वापरा आणि सामाजिक अंतर पाळा, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते भाईंदर पूर्वेकडील आरक्षण क्रमांक 122 मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, स्व.बाळासाहेब ठाकरे समर्पित कोविड रुग्णालय आणि मॉलेक्युलर प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइनच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.