पुण्यामध्ये शिवजयंतिनिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण - शिवाजी महाराज जयंती पुणे
🎬 Watch Now: Feature Video
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने पुण्यामध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे यंदाचे आठवे वर्ष आहे. याच सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या 85 स्वराज्यरथांचा सहभाग होता. यानिमित्ताने महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करुन मिरवणुकीत सहभागी झाले. अनेक चित्त थरारक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात होती.