केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड (पुणे) - केंद्र सरकार तपास यंत्रणाचा गैरवापर करत असून याआधी अस कधीच घडले नाही. एका ठिकाणी छापा टाकणे ठीक आहे. परंतु, एकाच व्यक्तीच्या नातेवाईकांवर अशा पद्धतीने कारवाई करणे अयोग्य असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या तपास यंत्रणांचा आणि सत्तेचा वापर राजकीय कारणासाठी करत आहेत. यापूर्वी अशी परिस्थिती पाहिलेली नाही. एखाद्याच्या घरी चौकशी करणे ठीक आहे. पण, सर्व नातेवाईकांच्या घरी जाणे आणि त्रास देणे हे बरोबर नाही. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या संदर्भात दिली आहे. ते पिंपरीत बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आर्यन खान प्रकरणात एनसीबीच्या धाडीत किरण गोसावी आणि भाजप पदाधिकारी पंच म्हणून मनीष भानुशाली उपस्थित असणे हे अयोग्य आहे, असेही पाटील म्हणाले. पुण्यातील फसवणूक प्रकरणात किरण गोसावी यांना अजून अटक केलेले नसल्याचेही ते म्हणाले आहेत.