'निवडणूक आयोगच्या अध्यक्षांना केंद्र सरकारने राज्यपालपद बहाल केल्याची चर्चा' - संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावे, हे योग्य नाही. हीच लोकं मग देशभरात जाऊन कोरोनाचा अधिक फैलाव करतील. मात्र, मद्रास हायकोर्टाच्या या टिप्पणीपूर्वीच निवडणूक आयोगच्या अध्यक्षांना केंद्र सरकारने कुठेतरी राज्यपालपद बहाल केल्याचीही चर्चा आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.