कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई, विरारमध्ये नाताळ साधेपणाने साजरा - Palghar Latest News
🎬 Watch Now: Feature Video
वसई, विरार शहरात दरवर्षी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मात्र यंदा नाताळच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वसई, विरार परिसरातील चर्चकडून चर्चमध्ये येणाऱ्या नागरिकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. ख्रिस्ती बांधव देखील नियमांचे पालन करून, नाताळचा सण साजरा करताना दिसत आहेत.