मुखेड तालुक्यात कारसह पितापुत्र गेले वाहून; पाहा व्हिडिओ - car drown in flood water
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - मुखेड उस्माननगर रस्त्यावरील मोती नाल्यास आलेल्या पुरात एक कार वाहून गेली. त्यामधील एकाने झाडाचा आधार घेतल्याने त्याला एका मदत पथकाने दोरीच्या साह्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले आहे. तर कारमधील पितापुत्राचा शोध घेतला जात आहे. मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथील रहिवासी भगवान राठोड ( ६५ ) व त्यांचा मुलगा संदिप राठोड ( ३८ ) हे त्यांच्यासोबत त्यांचा नोकर उद्धव देवकते याला घेवून क्र.एम.एच .२० डि.जे .६९२५ या कारने कमळेवाडी येथून पांडुर्णी मार्गे मुखेडकडे येत होते. सकाळी १०.४५ च्या सुमारास सदर कार मुखेडनजीक असलेल्या मोती नाल्याजवळ आली असता, चालक संदिप राठोड यास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.