ठाणे : बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - बीएसएनएलचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने प्रस्ताव तयार केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ कोकण विभागीय बीएसएनएल मुख्यालयाबाहेर बीएसएनएलमधील कार्यरत असलेल्या तीन कामगार संघटनांनी एकत्र येत निदर्शने करीत आंदोलन केले. कल्याण पश्चिम भागातील काळा तलाव परिसरात ठाणे, रायगड, पालघर , रत्नागिरी, सिंधदुर्ग या कोकणातीला जिल्ह्याचे कोकण विभागीय बीएसएनएल मुख्यालय आहे. या कार्यालयाच्या प्रवेश दारावर बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, ऑल इंडिया बीएसएनएल -डिओटी पेंशननर्स असोशियन, बीएसएनएल कॅज्युअल वर्कर फेडरेशन, या तिन्हा संघटनांचे टेलिकॉम कल्याण जिल्हा सचिव संतोष सोनी व वसंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.