thumbnail

वाशिममध्ये दिव्यांग मुलांनी केली उत्साहात होळी साजरी

By

Published : Mar 29, 2021, 10:21 PM IST

वाशीम - जिल्ह्यातील केकत उमरा येथील सिंधी बांधवांनी चेतन सेवांकुर ग्रुपच्या 14 सदस्यांसोबत धुळवड साजरी केली. दिव्यांग मुलांना कोणताही सण साजरा करताना आपल्या आई-वडिलांची कमी भासू नये यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सिंधी बांधवांसोबत वाशीमकरांनी केकत उमरा येथे दिव्यांग मुलांसोबत धुळवड साजरी केली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील केकत उमरा येथील अवलिया पांडुरंग उंचीतकर हे या मुलांचा सांभाळ करत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.