Ashok Chavhan Criticized BJP : भाजपला देशातील सर्व आरक्षण संपवायचे आहे - अशोक चव्हाण
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड- भाजपला देशातील सर्व आरक्षण संपवायचे ( BJP Wants To End Reservation ) आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) हे केवळ भाजपाच्या दुटप्पीपणामुळे थांबलं आहे. इम्पिरिकल डेटाबाबत केंद्र सरकारने ( Central Government On Empirical Data ) जी भूमिका घेतली, त्यावरून हे सिद्ध होत असल्याची टीका मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan Criticized BJP ) यांनी केली आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत ( Supreme Court On OBC Reservation ) दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (Election Without OBC Reservation ) पार पडणार आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गात नाराजी पसरली आहे. यावरुन केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.