Electric Bill Thrown at Nitin Raut : जालन्यात उर्जामंत्री नितीन राऊतांच्या ताफ्यावर भाजयुमोने फेकली वीजबिले - जालना भाजयुमो आंदोलन बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जालना - ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ताफ्यावर फेकले वीज बिले फेकण्यात आली आहे. जालन्यातील बदनापूर शहरात ही घटना घडली आहे. आज राऊत हे बदनापूरमध्ये नगर पंचायत निवडणुकीनिमित्त महविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी बदनापूर शहरात दाखल होत असताना सक्तीच्या वीजबिलांविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना राऊत यांच्या ताफ्यावर वीजबिले फेकली. भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री राऊत यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न केला.