टिळकांच्या गणेशोत्सवाचे बदलते रुप; पाहा बाबा आढावांची विशेष मुलाखत! - लोकमान्य टिळक पुण्यतिथी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिकळ यांची आज १००वी पुण्यतिथी. देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर अगोदर लोकांना एकत्र करावे लागेल, ही बाब टिकळांनी ओळखली होती. म्हणूनच 1894 साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेशोत्सव सुरू करण्यामागे टिळकांचा हेतू वेगळा होता. आता मात्र, गणेशोत्सवाचे स्वरूप एकदम बदलून गेले आहे. टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी गणेशोत्सवाबद्दल आपले मत व्यक्त केले.