वाढीव वीज बिलाबाबत ग्राहकांना लवकरच मिळणार दिलासा - अनिल परब - Anil Parab on Electricity Bill
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8215566-thumbnail-3x2-aniled.jpg)
मुंबई - लॉकडाऊन काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव विज बिलांसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह इतर काही मंत्री उपस्थीत होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून सामान्य ग्राहकांना दिलासा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार असल्याची माहिती कॅबीनेट मंत्री अनिल परब यांनी दिली.