Video : कशी तुझी जिरवली... भर आता शंभरचं! अजितदादांनी मोदींची उडवली खिल्ली - अजित पवारांची नरेंद्र मोदींवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13168093-thumbnail-3x2-pawar.jpg)
बारामती - आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं.. की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं... मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी पवार बोलत होते.