महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट, लस घेतल्यावरही होणार कोरोना - डॉ. राहुल पंडित - महाराष्ट्र कोरोना बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10998131-thumbnail-3x2-n.jpg)
मुंबई - मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा बऱ्याच जणांचा याची लागण झाली होती. आता पुन्हा येथे रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. अशा शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट असल्याचे म्हणता येईल, अशी माहिती फोर्टीस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे डायरेक्टर आणि महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे. लोकसंख्येची घनता, डायबेटीज-हायपरटेन्शनचे रुग्ण, उन्हाचा चटका आणि लोकांचा बेधडकपणा या कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोना पेशंट वाढले असून २०२४ पर्यंत कोरोना महाराष्ट्रातून जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
Last Updated : Mar 14, 2021, 7:42 PM IST