६० ते ८०च्या दशकातील दुचाकींचा संग्रह असणारा कर्नाटकातील 'सिव्हिल इंजिनिअर' - old bike lover karnataka news
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटकातील सिव्हिल इंजिनिअर रोशन शेट्टी त्यांच्या विशिष्ट आवडीमुळे स्थानिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे ६० ते ८०च्या दशकातील तब्बल ३० गाड्या आहेत. तेही चांगल्या स्थितीत. केवळ एका किकमध्ये त्या सुरूही होतात. शेट्टींकडे जावा, लेंब्रेटा आणि हार्ले-डेविडसन या गाड्यांचेही मॉडेल आहेत. शेट्टींकडे असणाऱ्या ३० गाड्यांपैकी २५ गाड्या रस्त्यावर चालवण्याच्या स्थितीत आहेत. लहानपणापासूनच रोशन यांना गाड्यांचे विशेष आकर्षण होते. त्यांनी आपली हीच आवड जोपासत वेगवेगळ्या मॉडेलच्या गाड्या जमा करण्यास सुरुवात केली. स्वत:च्या पायांवर उभे राहिल्यानंतर त्यांनी गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली. गेल्या १२ वर्षांत त्यांनी ३० गाड्यांचा संग्रह केला आहे.