आश्चर्य.. 'ही' म्हैस गावातील कुणावरही अंत्यसंस्कार असूदेत स्मशानात जाते - वाशिममधील म्हैस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4476901-699-4476901-1568797861349.jpg)
मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील गोवर्धन पाटील यांची राणी नावाची म्हैस गेल्या अनेक दिवसांपासून गावात अंत्ययात्रा निघाली की सोबत जाते. संपूर्ण अंत्यसंस्कार उरकेपर्यंत स्मशानभूमीत थांबते. ज्यावेळी गावकरी परत गावात येतात त्यावेळी ती ही परत येते. वनोजा गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ही म्हैस अंत्यविधीला जात असल्यामुळे गावातील नागरिक तिच्या अंगात गावातील आत्मा असल्याचे सांगतात.